रेनाँची ८०० सीसी कार २० मे रोजी भारतात

renault
रेनाँने त्यांची नवी ८०० सीसी कार जगात सर्वप्रथम भारतात लाँच करण्याचा निर्णय घेतला असून ही कार २० मे रोजी सादर केली जाईल असे समजते. या गाडीचे नांव अद्यापी जाहीर केले गेलेले नाही. सध्या ती एक्सबीए म्हणून ओळखली जात आहे. मात्र या कारसाठी केयो हे नांव नक्की केले जाईल असेही सांगितले जात आहे. या जपानी शब्दाचा अर्थ आहे दळणवळण अथवा संवाद. भारतातून ग्लोबल डेब्यू होणारी कंपनीची ही पहिलीच कार आहे. भारतानंतर ती दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये सादर केली जाणार आहे.

ही कंपनीची एन्ट्री लेव्हल कार म्हणूनही ओळखली जाणार आहे. रेनॉ आणि निस्सान या दोन कंपन्यांनी मिळून या कारचे ३ सिलींडरवाले ८०० सीसी इंजिन विकसित केले आहे. निस्सानही अशीच छोटी कार बनविण्याच्या तयारीत आहे आणि या दोन्ही कारमध्ये फक्त ब्रँडनेम वेगळे असेल असेही सांगितले जात आहे. रेनाँने गेल्याच आठवड्यात एमपीव्ही लॉजी ही कार लाँच केली होती.

Leave a Comment