खगोल शास्त्रज्ञांनी तयार केला विश्वाचा त्रिमिती नकाशा

space
टोरांटो : अलीकडेच विश्वाचा त्रिमिती नकाशा खगोल शास्त्रज्ञांनी तयार केला असून त्यात विश्वाची आजपर्यंतची स्थिती अधिक स्पष्ट चित्रात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विश्व हे दोन अब्ज प्रकाशवर्षे अंतरात पसरलेले आहे. दिर्घीकांच्या महासंचाचा हा गोलाकार नकाशा असून त्यात विश्वामध्ये द्रव्य कशा पद्धतीने विखुरलेले आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर कृष्णद्रव्याचाही वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. कृष्णद्रव्य हे अजूनही भौतिकशास्त्रातील एक मोठे कोडे मानले जाते.

दिर्घीकांचे स्थान हे एकसमान पद्धतीने आहे म्हणजेच त्या एकसमान पद्धतीने विखुरलेल्या आहेत. पर्वतांची जशी शिखरे व द-या असतात तशीच रचना या दिर्घीकांची शिखरे व दया यात दिसून येते. पूर्वीच्या विश्वातील पूंज स्पंदनांमुळे हा परिणाम झाला असावा असे वॉटर्लू विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र व खगोलशास्त्र विभागाचे प्रा. माईक हडसन यांनी म्हटले आहे. विश्वातील द्रव्याची गती व स्थान कळले तर त्यातून खगोल भौतिकशास्त्रज्ञ विश्वाचे प्रसारण व त्यात कृष्णद्रव्य किती आहे याचा अंदाज लागू शकेल.

वैज्ञानिकांच्या मते दिर्घीका या वेगवेगळ्या दिशांना प्रवास करीत असतात, कारण विश्वाचे प्रसारण एकसमान नसते.हे जे फरक असतात त्यांना विशिष्ट वेग कारण असतो. आपली आकाशगंगा व शेजारची देवयानी दिर्घीका या ताशी २० लाख किलोमीटर वेगाने जात आहेत असे संशोधकांचे म्हणणे आहे. आधीच्या प्रारूपानुसार ही गती अचूकपणे विचारात घेतली गेली नव्हती. हडसन व त्यांच्या सहका-यांना दिर्घीकांचा वेग कोणत्या प्रकारच्या रचनांमुळे असतो हे तपासण्यात रस आहे. दिर्घीकांच्या वेगातील फरक हे कृष्ण द्रव्य कशा प्रमाणात विखुरलेले आहे हे शोधण्याचे एक प्रमुख साधन आहे.

Leave a Comment