अंतराळात भरकटले रशियाचे मानवरहीत यान

iss
मॉस्को – आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर (आयएसएस) रशियाचे मानवरहीत अंतराळयान पोहोचण्यात अपयशी ठरले असून काही तांत्रिक बिघाडामुळे हे यान पृथ्वीवर केव्हाही पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र हे अंतराळयान कुठे पडेल, याचा अंदाज वर्तवणे कठीण असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रोग्रेस एम-२७ एम या अंतराळयानाशी संपर्क तुटल्याचे रशियाच्या स्पेस एजन्सीने स्पष्ट केले. तसेच या अंतराळयानाचे २८ एप्रिलला कजाकिस्तानमधून यशस्वी उड्डाण झाल्याची माहिती देण्यात आली होती.

या अंतराळयानाशी संपर्क साधण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरलेत. दरम्यान अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी या अंतराळयानाचे ४४ तुकडे झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र हे तुकडे रॉकेटच्या बॉडीचे आहेत की अंतराळयानाचे हे याबद्दल अजूनही त्यांना शंका आहे. दरम्यान हे अंतराळयान जर पृथ्वीच्या दिशेने परतत असेल, तर ते ७ ते ११ मे च्या दरम्यान जमिनीवर धडकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Comment