१०० वर्षांचे कासव पळतेय चाकांवर

kasav
वय वाढत जाईल तसे माणसेच नाही तर पशुही थकत जातात. मात्र याला अपवाद कासवाचा. मूळ संथ गतीनेच आयुष्य जाणारे कासव सर्व प्राणीपक्षांत दीर्घायुषी म्हणून ओळखले जाते. १०० पेक्षा अधिक वर्षे कासवे सहज जगतात. लंडनमधील एक असेच शतायुषी कासव उंदराच्या पराक्रमाने मात्र अपंग बनले आहे. उंदराने या कासवाचे चक्क पाय कुरतडले असल्याने ते चालू शकत नाही.

कासवाची प्रकृती बिघडली असल्याचे पशुवैद्यांचा लक्षात आले व त्यामागे कासवाचे चालणे फिरणे बंद झाले हे कारण असल्याचेही त्यांना लक्षात आले. हे कासव चालू फिरू शकले नाही तर ते जगणार नाही असे लक्षात आल्यावर या वैद्यांनी चकक खेळण्यातल्या विमानाची चाके या कासवाला इंजिनिअरच्या मदतीने बसविली. या उपायाचा उत्तम फायदा दिसून आला. कारण हे कासव आता पूर्वीपेक्षा दुप्पट वेगाने हालचाली करू शकते आहे. विशेष म्हणजे आपल्या मागच्या पायांनी पुढच्या चाकांना दिशा देता येते हेही त्याच्या लक्षात आले आहे. एकंदर कासवाच्या जीवावरचे संकट टळले म्हणायचे !