येथे दरोडेखोर यश मिळण्यासाठी बोलतात नवस, लावतात झेंडे

kelamata
राजस्थानातील सवाई माधोपूरपासून जवळ असलेल्या करोली जिल्ह्यातील केला देवी मंदिर खास कारणांनी प्रसिद्धीस आले आहे. हे मंदिर म्हणजे दरोडेखोरांसाठीचे तीर्थक्षेत्र असून या देवीच्या दर्शनासाठी डाकू वेश बदलून येतात, दरोडा यशस्वी व्हावा म्हणून नवस बोलतात आणि नवस फेडण्यासाठी पुन्हा दर्शनासाठी येऊन देवीच्या मंदिरात घंटा आणि विजयध्वज चढवितात.

विशेष म्हणजे येथे पोलिसांचा अहोरात्र पहारा असतो. देवीचे पुजारीही कोणी दरोडेखोर येणार असतील तर पोलिसांना तशी सूचना देतात मात्र जंगजंग पछाडूनही पोलिस गुन्हेगारांना पकडू शकत नाहीत. आजपर्यंत केवळ १-२ दरोडेखोरांनाच पोलिस पकडू शकले आहेत असेही सांगितले जाते. अर्थात या प्राचीन मंदिरात अन्य भाविकही मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

राजा भोमपाल याने १६ व्या शतकात या मंदिराची उभारणी केल्याचे सागितले जाते. उत्तर भारतात हे प्रसिद्ध शक्तीपीठ मानले जाते. मंदिरात दोन मूर्ती आहेत. पैकी एक मान कललेली देवी ही कैला माता आहे तर दुसरी चामुंडा देवी आहे. या मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. त्यातील एक म्हणजे मथुरेचा राजा कंस याने श्रीकृष्णाचा जन्मतःच वध करता यावा म्हणून देवकी वसुदेवाला कैदेत टाकल्यानंतर आठवे अपत्य म्हणून ज्या कन्येचा वध करण्याचा प्रयत्न केला ती योगमाया म्हणजेच ही देवी असल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment