फेसबुक सरसावले भूकंपपीडितांच्या मदतीसाठी

facebook
वॉशिंग्टन : आता सोशल नेटवर्किंग वेबसाइट ‘फेसबुक’ ही भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या नेपाळमधील नागरिकांना सावरण्यासाठी सरसावली आहे. फेसबुकने त्यांच्या होम पेजवर देणगी (डोनेशन) देण्यासाठी सुविधा उपलब्ध केली आहे.‘फेसबुक’ वर लॉगइन केल्याबरोबर तुमच्या स्क्रिनवर डोनेशन असे येईल. त्यावर क्लिक करून तुम्ही नेपाळमध्ये भूकंप बळींना मदत करण्यासाठी निधी पाठवू शकता. याच बरोबर ‘फेसबुक’ ने नेपाळमधील भूकंप
पिडितांसाठी १२ कोटी ६८ लाख २२ हजार ९०० रुपयांची मदत देऊ केली आहे.

‘अनेक लोक नेपाळमधील भूकंप पिडितांसाठी पुढे येत आहेत. शिवाय, भारत आणि बांगलादेशला देखील मदत पुरवली जात आहे,’ असे ‘फेसबुक’ कडून सांगण्यात आले आहे. नेपाळला आंतरराष्ट्रीय मेडिकल कॉप्र्सकडून जेवढी मदत केली जाणार आहेत तेवढीच मदत ‘फेसबुक’ कडून करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय मेडिकल कॉप्र्सअंतर्गत एखाद्या व्यक्तीने २० लाख डॉलरची मदत केली तर ‘फेसबुक’ देखील तेवढीच रक्कम दान करणार आहे.

Leave a Comment