शिओमी ही चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी लवकरच त्यांचा नवा फ्लॅगशीप स्मार्टफोन बाजारात उतरविण्याच्या तयारीत आहे. हा नवा फोन एमआय फाईव्ह या नावाने आणला जाईल असे सांगितले जात असून या फोनची कांही फिचर्स लिक झाली आहेत.
शिओमीचा एम आय फाईव्ह येतोय
लीक झालेल्या माहितीनुसार फिंगरप्रिट सेन्सर सह नवा फोन बाजारात आणला जाईल. या फिचरसह येणारा शिओमीचा हा पहिलाच स्मार्टफोन आहे. कंपनीने नुकताच त्यांचा एमआय फोर लाँच केला आहे.
नवीन फोनला स्नॅनड्रॅगन प्रोसेसर, २०.७ किंवा १३ एमपीचा कॅमेरा, १६ व ६४ जीबी इंटरनल मेमरी, फोर जी एलटीई कनेक्टीव्हीटी सुविधा असेल असेही सांगितले जात आहे. या स्मार्टफोनची स्क्रीन बॉडी अतिशय पातळ असेल आणि हा फोन अवघा ५.१ मिमी जाडीचा असेल तसेच त्याला ५.७ किंवा ५.५ इंची स्क्रीन दिला जाईल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.