टोयोटोची तीनचाकी कार कम मोटरबाईक

toyto
टोकियोवासियांना येत्या शुक्रवारपासून जपानची अग्रणी कार उत्पादक कंपनी टोयोटोने त्यांच्या तीन चाकी इलेक्ट्रीक कार कम मोटरबाईकची सवारी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि इंधन बचत या तीन कसोट्यावर ही कार उत्तम पर्याय असल्याचा कंपनीचा दावा आहे. आय रोड व्हेईकल कन्सेप्ट म्हणून बनलेल्या या कारच्या प्रवासी चाचण्यांसाठी कंपनीने जपानी कार शेअरिंग सर्व्हीस ऑपरेटर पार्क २४ को. लिमिटेडशी करार केला आहे. सहा महिने या चाचण्या सुरू राहणार आहेत.१५ मिनिटांसाठी ३ डॉलर्स भाडे भरून नागरिक ही गाडी शहरातील कोणत्याही स्टेशनवरून घेऊ शकतील आणि दुसर्‍या स्टेशनवरसुद्धा परत करू शकतील. यात मोटरसायकल प्रवासाचा आनंद आहे आणि कार प्रवासाची सुरक्षितता आहे.

या कारची पुढची दोन चाके मोटरसायकलप्रमाणे खालीवर स्वतंत्रपणे हलू शकतात मात्र मागे असलेल्या तिसर्‍या चाकामुळे या वाहनाला कारची स्थिरता मिळते. आय रोडचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याचा निर्णय अद्यापी घेतला गेलेला नाही. आय रोड चीफ इंजिनिअर अकिहिरो यानाका या संदर्भात म्हणाले की आज जगात सर्वत्रच वाढलेली वाहने, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, प्रदूषण यांच्या समस्या मोठ्या आहेत. त्यामुळे स्मार्ट मोबिलीटीचा पर्याय स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही. आकडेवारीनुसार जपानमध्ये मोठ्या शहरात कार वापरणार्‍यात ७० टक्के लोक एकट्यासाठीच कारचा वापर करतात. त्यांना हा उत्तम पर्याय आहे.

जर्मनीत डेमलरने मोबाईल अॅपचा वापर करून मिळविता येणारी स्मार्टफॉर टू ही कारसेवा उपलब्ध करून दिली आहे. कार्टूगो असे या सेवेचे नांव असून ३० युरोपियन देशातील १० लाख नागरिकांनी त्याचे सदस्यत्व घेतले आहे.

Leave a Comment