एसरचा ट्रीपल सिम लिक्वीड एक्स टू लाँच

acer
एसरने त्यांचा लिक्वीड एक्स टू स्मार्टफोन लाँच केला आहे.४००० एमएएच ची बॅटरी आणि ट्रीपल सिम कार्ड सपोर्ट ही या स्मार्टफोनची खास वैशिष्ठे आहेत. फोन बाजारात विक्रीसाठी कधी येणार, किंमत किती असेल आणि फोनसाठी ऑपरेटिंग सिस्टीम कोणती या विषयी कोणतीही माहिती कंपनीने जाहीर केलेली नाही.

न्यूयॉर्क प्रेस कॉन्फरन्समध्ये हा फोन सादर केला गेला आहे. ५.५ इंची डिस्प्ले,१३ एम.पी.चा कॅमेरा, क्विक टच फ्लिप केस अशी त्याची अन्य वैशिष्ठे आहेत. क्विक टच फ्लिप केसमध्ये व्हर्टीकल स्लॉट दिला केला आहे.यामुळे म्युझिक कंट्रोल, हवामान, वेळ व अन्य फंक्शन्स फ्लिप कव्हर न उघडताही करता येतात. ज्या लोकांना प्रवास खूप करावा लागतो त्यांच्यासाठी हा फोन आदर्श ठरले असा कंपनीचा दावा आहे.

गेल्या माहिन्यातच कंपनीने पहिला विंडोज फोन ८.१ एसर लिक्वीड एम २२० लाँच केला आहे. त्यापूर्वी कंपनीने विंडोज सेव्हन वरचे स्मार्टफोनही लाँच केले आहेत.

Leave a Comment