ट्रायची वेबसाईट हॅकर्सकडून हॅक

hackers
नवी दिल्ली- एका हॅकिंग ग्रुपने नेट न्युट्रलिटीसंदर्भात सर्वांकडून सूचना मागविल्यानंतर टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया किंवा ट्रायने सर्वांचे इमेल आयडी आणि संभाषण जाहीर केल्यामुळे ट्रायची वेबसाइट हॅक केली होती.

ट्रायची वेबसाईट AnonOpsIndia (@opindia_revenge) या नावाच्या ट्विटर अकाउंटने हॅक केल्याचा दावा केला आहे. तुम्ही आमचे इमेल आयडी जाहीर केले तेव्हा आता आम्ही तुमची वेबसाईट हॅक करू, असे ट्विट या ग्रुपने केले आहे.

ट्रायला वाटते की ते इंटरनेटवर नियंत्रण ठेऊ शकतात परंतु काही मुलांकडून त्यांची फिरकी घेतली जात आहे असे ट्विट त्यांनी वेबसाईट हॅक करुन एका तासानंतर दुसरे ट्विट केले.

ट्रायने नेट न्युट्रालिटीसंदर्भात इमेलवर सूचना मागितल्या होत्या. टेलिकॉम कंपन्यांच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी या सूचना आवश्यक आहेत असे समजून लाखो लोकांनी त्या ट्रायला पाठविल्या. त्या सूचना घेऊन त्यावर आवश्यक ती पावले उचलणे हे ट्रायने अपेक्षित असताना त्यांनी सूचना पाठविणा-यांचे इमेल आयडी जाहीर केले. यामुळे या हॅकिंग ग्रुपने ट्रायची वेबसाइट हॅक केली.

Leave a Comment