नाशिक महाकुंभमेळ्यात साधूंना ओळखपत्रे

nashik
नाशिक- ऑगस्ट २०१५ मध्ये नाशिक येथे होत असलेल्या महाकुंभमेळ्यात सहभागी होणार्‍या देशभरातील साधूंना सरकार ओळखपत्रे देणार आहे. देशभरात कुंभमेळ्यात साधूंना ओळखपत्रे देण्याचा हा पहिलाच प्रयेाग आहे. मेळ्यात भाविक अनेकदा भोंदू साधूंना बळी पडतात आणि हे साधू साध्याभोळ्या भाविकांकडून पैसे, दागदागिने अशा मौल्यवान वस्तूंची लूट करतात अशा तक्रारी यापूर्वी आल्या आहेत. साधूच्या वेशात असल्याने या भोंदूची ओळख पटत नाही. त्याला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे.

अखिल भारतीय आखाडा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ही ओळखपत्रे दिली जाणार असल्याचे समजते. या मेळाव्यात दोन कोटी भाविक आणि ८ लाख साधू उपस्थिती लावतील असा अंदाज आहे. या सर्व आठ लाख साधूंना ओळखपत्रे दिली जातील असे समजते. मेळ्यातले पहिले शाही स्नान २९ ऑगस्टला, दुसरे १३ सप्टेंबरला तर तिसरे १८ सप्टेंबर २०१५ ला होणार आहे.

Leave a Comment