अ‍ॅप्स निर्मितीत अ‍ॅपल वॉचमुळे मोठी संधी

watch
सॅन फ्रॅन्सिस्को : अ‍ॅपल वॉचच्या सॉफ्टवेअरनिर्मिती क्षेत्रात आगमनामुळे अ‍ॅप्स निर्मितीच्या माध्यमातून नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणातील प्रचार, ऑनलाईन खरेदीवर भर देत अ‍ॅपल वॉचने जगाच्या बाजारपेठेत प्रवेश केला. मागणी वाढत लक्षात घेऊन कंपनीने आगमनापूर्वीच पूर्वनोंदणीची सुविधाही उपलब्ध करून दिली होती.

अ‍ॅण्डड्रोइडबेस्ड स्मार्टफोन्सच्या लोकप्रियतेमुळे अ‍ॅप्स निर्मितीच्या क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण झाली होती. मात्र आता अ‍ॅपल वॉचच्या माध्यमातून अ‍ॅप्स निर्मितीमध्ये पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली आहे. अमेरिकन एक्स्प्रेस, ईएमसी आणि इबे या कंपन्यांसाठी अ‍ॅप्स तयार करणा-या वाय मिडिया लॅबच्या डॅनियल तागुची याबाबत बोलताना म्हणाल्या की, आरोग्य, वाहतूक आणि सोशल मिडिया या तीन प्रमुख क्षेत्रांमध्ये अ‍ॅपल वॉचचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेता येऊ शकेल. सध्या अ‍ॅपल वॉचवर ३,०६१ अ‍ॅप्स कार्यरत आहेत त्यापैकी १० टक्के गेम्सच्य अ‍ॅप्स असून केवळ ७ टक्के अ‍ॅप्स या जीवनशैली, आरोग्याविषयीच्या आहेत.

Leave a Comment