फेसबुक टाकणार कात

facebook
न्यूयॉर्क : फेसबुकने सोशल नेटवर्किंग साईट्सच्या गर्दीत आपली लोकप्रियता कायम ठेवण्यासाठी काही नवे बदल करण्याचे ठरविले असून आता फेसबुकच्या न्यूज फीडद्वारे आपल्या फ्रेण्ड्सविषयी अधिक माहिती मिळू शकणार आहे. फेसबुकच्या अधिकृत ब्लॉगवर यासंबंधीची घोषणा करण्यात आली आहे.

आपल्याला हवी असलेली अधिकाधिक माहिती देण्याचा प्रयत्न न्यूज फीडच्या नव्या रचनेत करण्यात येईल. त्यानुसार फ्रेण्डस्नी थेट पोस्ट केलेले फोटो, व्हीडीओ, स्टेटस अपडेट आणि इतर लिंक्स न्यूज फीडवर प्राधान्याने दिसतील. त्यामुळे मित्रांबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती मिस होण्याची शक्यता कमी होईल. फ्रेण्डस्च्या न्यूज स्टोरीवर आलेले कमेंट आणि इतरांनी केलेल्या पोस्ट सर्वांत शेवटी राहतील किंवा दिसणारसुद्धा नाहीत. या बदलांमुळे कमी महत्त्वाच्या घडामोडींकडे यूजर्सचे लक्ष जाणार नाही आणि आपल्याशी संबंधित असलेल्या विषय लवकर नजरेस पडतील. तसेच आता एकाच सोर्सकडून आलेल्या एकापेक्षा अधिक पोस्टसुद्धा आपल्याला एकाच वेळी पाहता येतील. न्यूज फीडच्या प्राधान्यक्रमाबाबत अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे हे बदल करणे आम्हाला क्रमप्राप्त होते, असे फेसबुकने म्हटले आहे. या बदलांमुळे अनावश्यक रेफरल टड्ढॅफिकवर मर्यादा येणार असून फेसबुकवर अधिक समर्पक कंटेन्ट मिळू शकेल.

त्याचबरोबर ट्रू कॉलर आणि इतर अनेक अ‍ॅपप्रमाणे फेसबुकने कॉलर आयडीची सेवा पुरविणारे अ‍ॅप तयार केले आहे. हॅलो असे या अ‍ॅपचे नाव असून ते अ‍ॅण्डड्ढॉइड फोनवरून वापरता येईल. या अ‍ॅपमुळे एखादा नंबर सेव्ह नसला तरी फेसबुकच्या माध्यमातून त्या नंबरची माहिती मोबाईलवर मिळेल. या अ‍ॅपमध्ये कॉल ब्लॉकिंग सुविधासुद्धा उपलब्ध राहणार आहे. हॅलोच्या चाचण्या पूर्ण झाल्या की, लवकरच ते ग्राहकांच्या सेवेत रूजू होईल.

Leave a Comment