नवी दिल्ली- नेट न्युट्रालिटीस भारतातील टेलिकॉम कंपन्यांनी आपला पाठिंबा दर्शवला असून इंटरनेटचा ‘फ्री अॅंड फेअर’ अॅक्सेस मिळावा यासाठी आपण समर्थन करत आहोत असे कंपन्यांनी जाहीर केले आहे.
नेट न्युट्रालिटीबाबत सर्वांना सारखे नियम लागू करा
त्याबरोबरच सारख्या सेवांना सारखे नियम लागू करावेत अशी सूचना देखील त्यांनी ट्रायला दिली आहे. नेट न्युट्रालिटीबाबत सूचना मागविण्याची ट्रायने दिलेली शेवटची तारिख होती. आम्ही ग्राहकांच्या बाजूने आहोत. एखाद्या कंपनीची वेबसाइट ब्लॉक करणे हे आमच्या तत्वात नाही असे एअरटेलच्या गोपाल विठ्ठल यांनी स्पष्ट केले. ते सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते. नेट न्युट्रालिटीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे असे नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडियाने सांगितले आहे.