यामिनीच्या मेंदूत आढळले जुळे भ्रुण

yamini
लॉस एंजलिस – एका २६ वर्षीय महिलेच्या मेंदूमध्ये जुळे भ्रूण आढळून आले असून या महिलेला ब्रेन ट्युमर असल्याच्या शक्यतेने तिची शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना हाडे, केस आणि विशेष म्हणजे, दात असलेले जुळे भ्रूण आढळले.

यामिनी मूळची हैदराबादची असून करानाम इंडियाना विद्यापीठात पीएच डी करीत आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरपासून वाचताना आणि बोलताना त्रास जाणवू लागल्याने ‌ती डॉक्टरांकडे गेली. पुढे तिला जेवणेही त्रासदायक होऊ लागले. डोक्यातील वेदना तिला असह्य होऊ लागल्या होत्या. डॉक्टरांनी तपासणी केली असता, त्यांना यामिनीच्या मेंदूच्या मध्यभागी वाटाण्याच्या आकाराएवढी गाठ आढळली. तिला पिनिअल ट्युमर असल्याचे निदान करण्यात आले.
या वर्षाच्या मार्चमध्ये लॉस एंजलिसच्या स्कलबेस इन्स्टिस्ट्यूटमधील मेंदूवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये निष्णात डॉ. रायर शाहिनियान यांच्याकडे यामिनीने उपचार घेण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी यामिनीची इंडोस्कोपी केली असता, त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. हाडे, केस आणि दात असलेले भ्रूण त्यांना यामिनीच्या मेंदूत आढळले. डॉ. शाहीनियान यांनी यशस्वीरित्या ते काढून टाकले. यामिनी लवकरच पूर्ण बरी होईल, असा त्यांना विश्वास आहे.

Leave a Comment