जगातील सर्वाधिक आनंदी देश आहे स्वित्झर्लंड

switzerland
न्यूयॉर्क – एका सर्वेक्षणात पृथ्वीवरील स्वर्ग अशी ओळख असलेला स्वित्झर्लंड देश हा जगातील आनंदी देश असल्याचे समोर आहे. जागतिक आनंदाबाबतच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या एसडीएसएनने जाहीर केलेल्या निकषावर आधारित अहवालात स्वित्झर्लंड देशाचा जगातील आनंदी देशांमध्ये पहिला क्रमांक लागतो. त्या खालोखाल आईसलँड, डेन्मार्क, नॉर्वे आणि कॅनडा या देशांचे स्थान आहे. तर टोगो, बुरुंडी, बेनिन आणि रावंडा हे देश दुखी असल्याचे अहवालात म्हटले आहे. यासाठी जगातील १५८ देशांचा अभ्यास करण्यात आला होता. या संपूर्ण अभ्यासाअंती स्वित्झर्लंड देशातील नागरिक अधिक आनंदी असल्याचे आढळून आले.

Leave a Comment