वायबरचा देशात ४ कोटीचा टप्पा पार

viber
नवी दिल्ली- देशात ४ कोटी युझर्सचा टप्पा इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप असलेल्या वायबरने पार केला असून या अ‍ॅपच्या युझर्सची जगभरातील ही सर्वाधिक संख्या ठरली आहे.

आमच्यासाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून विकसित झाली आहे. देशभरात ४ कोटी नोंदणीकृत युझर्सचा टप्पा ओलांडला असून हा आमच्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. या अ‍ॅपची लोकप्रियता वाढत असल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचे वायबर इंडियाचे देशातील प्रमुख अनुभव नय्यर यांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षभरात वायबरने सातत्यपूर्ण आपल्या युझर्समध्ये वाढ दर्शवली असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय ग्राहकांच्या गरजांनुसार नवीन्यपूर्ण सुविधा देण्याच्या धोरणाचा फायदा झाला. स्टिकर्सने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली असून यावर ७००० ते ८००० स्टिकर्स असल्याचे नय्यर म्हणाले.

फेब्रुवारी २०१४मध्ये वायबरने जपानच्या राकुटेनची ९० कोटी डॉलरमध्ये खरेदी केली. लाईन, हाईक, व्हॉट्सअ‍ॅप आणि निमबझ याबरोबर वायबरला स्पर्धा करावी लागत आहे.