मायक्रोमॅक्सचा लो बजेट स्मार्टफोन

canvas
मुंबई: भारतीय कंपनी मायक्रोमॅक्सने लिनोव्हो आणि शिओमी या चीनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी कॅनव्हास स्पार्क हा आपला लो बजेट स्मार्टफोन लाँच केला असून या स्मार्टफोनची किंमत रु. ४,९९९ आहे.

ऑनलाइन कॉमर्स वेबसाइट स्नॅपडीलवर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. २९ एप्रिलपासून हा फोन ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.

मायक्रोमॅक्स कॅनवास स्पार्क स्मार्टफोनची वैशिष्ट्ये -४.७ इंच डिस्प्ले, -५४०x९६० पिक्सल रिजोलुशन -ड्युएल सिम -अँड्रॉईड लॉलिपॉप ५.० -प्रोसेसर
१.३ क्वॉड कोअर मीडियाटेक -८ मेगापिक्सल रिअर कॅमेरा, २ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा -१ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी आणि ३२ जीबी एक्सपांडेबल -जीपीएस, ब्लुटूथ आणि ३जी -स्क्रॅचेस पासून संरक्षणासाठी गोरिल्ला ग्लास

Leave a Comment