मंगळवारीसाठी नासाने जगभरातून मागविल्या सूचना

nasa
वॉशिंग्टन : आता मंगळावर जाण्याचे पृथ्वीवरील शास्त्रज्ञांना वेध लागले असून मंगळावर जाण्यासाठी जवळपास वर्षभराचा कालावधी लागतो. अंतराळवीरांचा हा प्रवास सुरक्षित करण्यासाठी काय काय उपायोजना कराव्यात याबाबत नासाने जगभरातून सूचना मागवल्या असून या स्पर्धेतील विजेत्यांना ३० हजार डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार आहे. ही स्पर्धा जगातील सर्वांसाठी खुली असून २९ एप्रिल ते २९ जून दरम्यान स्पर्धकांना उत्तरे पाठविता येतील.

पृथ्वीच्या वातावरणात चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव असतो. मात्र पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यानंतर मंगळावर जाण्यासाठी किमान ५०० दिवस लागतात. या कालावधीत अंतराळात गॅलाक्टिक कॉस्मिक रेज (जीसीआर), उच्च शक्तींची किरणे आदींचा मोठा त्रास अंतराळवीरांना होऊ शकतो. त्यामुळे जीसीआर किरणांपासून मानवाचा कसा बचाव करता येईल याचे मोठे आव्हान आता शास्त्रज्ञांसमोर आहे.

मानवी अंतराळ मोहिमेतील अनंत अडचणी सोडविण्यात सामान्य माणूस सहभागी होत आहे ही आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असून मंगळ मोहिमेसाठी जाणा-या अंतराळवीरांचे संरक्षण करणे ही मोठी समस्या आहे, असे नासाचे डेप्युटी मॅनेजर स्टीव्ह रडेर यांनी सांगितले. अंतराळ मोहिमेतील किरणांचा सामना करण्यासाठी यापूर्वी पाच जणांना ‘नासा’ ने १२ हजार डॉलर्स दिले होते. मात्र त्यांना ही समस्या सोडविण्यात यश आले नव्हते.

Leave a Comment