ओप्पो चा जॉय प्लस अवघ्या ६९९० रूपयांत

oppo
चीनी स्मार्टफोन मेकर कंपनी ओप्पो ने त्यांच्या जॉय सिरीजमधला आणखी एक लो बजेट स्मार्टफोन भारतीय बाजारात उतरविला असून जॉय प्लस या नावाने आलेला हा फोन अवघ्या सात हजार रूपयांत ग्राहकांना मिळू शकणार आहे.

गेल्या वेळी ओप्पोने भारतीय बाजारात आणलेल्या ओप्पो जॉयची किंमत ८९९० रूपये होती. त्यापेक्षाही कमी किमतीत नवा फोन त्यांनी सादर केला आहे. ४ इंची डिस्प्ले, ४.४.२ अँड्राईड किटकॅट ओएस, ड्युअल सिम, १ जीबी रॅम, ४ जीबी इंटरनल मेमरी, मायक्रोकार्डने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, एलईडी फ्लॅशसह ३ एमपीचा रियर तर ०.३ एमपीचा फ्रंट कॅमेरा, थ्रीजी, वायफाय, जीपीआरएस/ एज, ब्ल्यू टूथ कनेक्टीव्हीटी अशी त्याची अन्य फिचर्स आहेत.

Leave a Comment