टेल्को कंपन्या नेटिझन्सच्या दबावापुढे झुकल्या

net
नवी दिल्ली- टेल्को कंपन्यांना अखेर नेट न्युट्रालिटी व्हायोलेशनच्या विरोधात लढणाऱ्या नेटिझन्सच्या दबावापुढे झुकावे लागले असून सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने आपण नेट न्युट्रालिटीला पाठिंबा देत आहोत असे जाहीर केले आहे.

इंटरनेट बाबत काय करावे हा निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी ग्राहकांकडे आहे, असे असोसिएशनने म्हटले आहे. आम्ही कुठलाही भेदभाव न करता, कुठलेही वेगळे दर न लावता ग्राहकांना सेवा देण्याचे वचन देतो, असे असोसिएशनने म्हटले आहे. मिळणाऱ्या स्वातंत्र्यातून ग्राहकांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा असे आम्हाला वाटते, या शब्दात असोसिएशनने आपले समर्थन दर्शवले आहे. एअरटेल, एअरसेल, आयडिया सेल्युलर, युनिनॉर, व्होडाफोन, व्हिडिओकॉन, फेसबुक आणि गुगल या असोसिएशनचे सदस्य आहेत.

Leave a Comment