जपानच्या मॅग्लेव रेल्वेने काढले सर्व विक्रम मोडीत

railway
टोकयो – मंगळवारी जपानच्या मॅग्लेव रेल्वेने ताशी ६०३ किलोमीटर वेगाने धावत यापूर्वीचे सर्व विक्रम जगातील सर्वाधिक वेगाने धावणा-या रेल्वेंचे मोडीत काढले.

ही रेल्वे जपानच्या माऊंट फुजीजवळ घेण्यात आलेल्या चाचणीदरम्यान तब्बल ताशी ६०३ किलोमीटर वेगाने धावली. मध्य जपान रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही मॅग्लेव रेल्वेने वेगाने ६०३ किमी धावून याआधीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहे आणि तब्बल ११ सेंकदापर्यंत ही रेल्वे ६०० किमीच्या ताशी वेगाने धावत होती.

गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या चाचणीदरम्यान या रेल्वेने ५९० किलोमीटर ताशी वेगाचा विक्रम नोंदवला होता. हा विक्रम आज मॅग्वेलनेच मोडीत काढला. २०२७ पर्यंत ही रेल्वे सेवा सुरु करण्याचा मध्य जपान रेल्वेचा मानस आहे. टोकयो ते नागोया या शहरदरम्यान ही रेल्वे चालवण्यात येणार आहे. सध्या टोकयो ते नागोया यादरम्यानच्या २८० किमीच्या प्रवासाला ८० मिनिटे लागतात. या रेल्वेने हा प्रवास केवळ ४० मिनिटांत करता येणार आहे.

Leave a Comment