सोनीचा एक्सपिरीया झेड ४ जपानमध्ये सादर

experia-z
सोनीने त्यांच्या एक्सपिरीया झेड सिरीजमधील झेड फोर स्मार्टफोन कोणताही खास गाजावाजा न करता जपानमध्ये लाँच केला आहे. हा फोन जागतिक पातळीवर कधी लाँच होईल यासंबंधीची कोणतीही माहिती तसेच या फोनची किंमतही कंपनीने जाहीर केलेली नाही.

सोनीने त्यांच्या झेड थ्री नंतर सात महिन्यांच्या कालावधीने हा फोन सादर केला आहे. त्याला अँड्राईड लॉलिपॉप ५.० ओएस, ५.२ इंची फुल एचडी ट्रायल्युमिनस डिस्प्ले, ३ जीबी रॅम, २०.७ एमपीचा ऑटोफोकस रियर कॅमेरा, सेंसर व एलइडी फ्लॅशसह दिला गेला आहे. ५.१ एमपीचा फ्रंट कॅमेरा एक्समोर आर बीएसआय सेन्सरसह आणि २५ एमएमच्या वाईड अँगल लेन्ससह असून इलेक्ट्रोनिक इमेज स्टॅबिलायझेशची सुविधाही दिली गेली आहे. ३२ जीबीची इंटरनल मेमरी कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, वॉटरप्रूफ, डस्टप्रूफ मेटल फ्रेम, १४४ ग्रॅम वजन, अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. वायफाय, ब्ल्यू टूथ, थ्रीजी, फोर जी, जीपीएस, मायक्रो यूएसबी कनेक्टीव्हीटीची सुविधा आहे.

Leave a Comment