गुगलने लॉन्च केले इनबॉक्स अॅप

invox
नवी दिल्ली : इंटरनेट यूझर्स गूगल प्लस, यूट्यूब आणि जी मेल वापर आपल्या विविध कामांसाठी वापर करू शकेल. आता गूगलने इनबॉक्स अॅसप लॉन्च केले आहे. या अॅलपद्वारे रेल्वे तिकिटापासून ऑनलाईन शॉपिंग पर्यंतचे अलर्ट मिळू शकतात. एवढेच नाही तर या अॅलपमध्ये आपल्या कुटुंबासाठी वेगळा इनबॉक्स, मित्रांसाठी आणि कार्यालयीन कामकाजासाठी वेगळा इनबॉक्स बनवू शकतो. तसेच हे अॅ प एक वेगळ्या सोशल नेटवर्किंगचा साइटचा लूक देते.

या अॅपमध्ये आवश्यक कामांची यादी देखील बनविली जाऊ शकते. ते आपणास वेळपूर्वी अलर्ट करू शकेल. सोशल साइट सारख्या दिसणा-या या अॅलपमध्ये ई-मेल शिवाय अनेक खास फीचर समाविष्ट आहेत. याचा फोनशिवाय डेस्कटॉपवरूनही वापर केला जाऊ शकतो. तुर्त इनबॉक्स अॅशपचा वापर काही विशेष लोकच करीत आहेत. इतर लोकांसाठी या अॅापच्या वापरासाठी गूगकडून इनव्हाईट रिक्वेस्ट प्राप्त करावी लागेल.

एक मेल पाठवून इनव्हाईट रिक्वेस्ट प्राप्त केले जाऊ शकते. इनबॉक्स अॅरपमध्ये बंडल्स नावाचे फीचर समाविष्ट आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयाशी संबंधित ईमेल वेगळ्या बॉक्समध्ये दिसेल. मित्र आणि कुटुंबातील लोकांचे ई मेल देखील वेगवेगळ्या बॉक्समध्ये दिसतील. यामध्ये विमान किंवा रेल्वे तिकिटाची माहिती वेगळ्या पद्धतीने हायलाईट करण्यात आलेली असेल.

जर कोणी यूझर्सने कोणत्या ऑनलाईन शॉपिंग साइटवरून साहित्य खरेदी केले असेल, तर त्याची डिलीवरी ट्रॅक करण्यासाठी देखील एक वेगळा बॉक्स हायलाईट केलेला आहे. तसेच अॅमपमध्ये ई मेलला अलार्मसारखे स्नूज करण्याची सुविधा आहे. जर आपण इनबॉक्सच्या मेलला उद्या किंवा नंतर एका निश्चित वेळेनंतर पाहायचे असेल तर ते पाहू शकता. त्याला एका क्लीकसरशी स्नूज करू शकता. हे चांगल्या पद्धतीने रिमायंडर सुद्धा दिसेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार इनबॉक्स अॅ प्लीकेशनमध्ये जीमेलमध्ये पहिल्यापासून उपलब्ध असलेले फीचर्संना अधिक चांगले बनविण्यात आलेले आहे. यामुळे यूझर्स आपले खरेदी आणि बँक अकाउंटचे विवरण देखील पाहू शकतात.

Leave a Comment