गुगल ड्राईव्हवर घ्या व्हॉट्स अॅप संवादाचा बॅकअप

whatsapp
नवी दिल्ली – आपल्या युझर्ससाठी नवीन सुविधा अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या व्हॉट्स अॅपने सुरू केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून व्हॉट्स अॅपवरील संवादाचा बॅकअप गुगल ड्राईव्हवर घेता यावा, याबाबात युझर्सकडून मागणी सुरू होती. युझर्सची वाढती मागणी लक्षात घेता व्हॉट्स अॅपने संवादाचा बॅकअप गुगलड्राईव्हवर घेण्याची सुविधा सुरू केली आहे.

यासाठी तुम्हाला व्हॉट्स अॅपचे v2.12.45 हे नवीन व्हर्जन डाऊनलोड करावे लागेल. हे व्हर्जन व्हॉट्स अॅपच्या साईटवरून डाऊनलोड करता येणार आहे. हे नवीन व्हर्जन डाऊनलोड केल्यानंतर चॅट सेंटिंगमधील बॅकअप टू गुगल ड्राईव्ह हा पर्याय निवडावा. त्यानंतरच ही सुविधा तुमच्या फोनमध्ये सुरू होईल. हे व्हर्जन गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध नाही. तसेच व्हॉट्स अॅपची ही नवीन सुविधा सध्या आयओएस आणि विंडोज फोनवर उपलब्ध नाही.

इन्स्टंट मेसेजिंग अॅपच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युझर्ससाठी नवीन सुविधा देत असते. काही दिवसांपुर्वीच व्हॉट्स अॅपने व्हाईस कॉलिंगची सुविधा सुरू केली.

Leave a Comment