खास चिनी ग्राहकांसाठी आला शाओमी एमआय नोट

xiaomi
खास चिनी ग्राहकांसाठी चीनच्या स्मार्टफोन कंपनी शिओमीने काळ्या व वूडन फ्रेममधील एमएआय नोट बाजारात आणला असून त्यांच्या किमती अनुक्रमे ४०० यूएस डॉलर्स म्हणजे २४९३० रूपये व ३७० डॉलर्स म्हणजे २३०६० रू. अशा आहेत. हा फोन खरेदी करणार्‍या ग्राहकांना त्यासोबत सिंगर जेसन जांग याचा अल्बम भेट म्हणून दिला जाणार आहे.

या दोन्ही मॉडेल्सचे डिझाईन पहिल्या एमआय नोट प्रमाणेच आहे. ५.७ इंची फुल एचडी स्क्रीन, गेम्सची भरभरून मजा लुटण्यासाठी ग्राफिक्स अड्रेनो ३३० जीपीयू, ३ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी, १३ एमपीचा रियर ऑटोफोकस एलईडी कॅमेरा, ५ एमपीचा सेल्फीसाठी कॅमेरा अशी अन्य फिचर्स आहेत.

Leave a Comment