जपानची वृद्धत्वाकडे वेगाने वाटचाल

japan
जपानच्या जन्मदरात सतत चौथ्यावर्षी घट नोंदविली गेली असून गेल्या १५ वर्षांतील ही सर्वाधिक घट आहे. यावेळी जपानचा जन्मदर २००० सालातील जन्मदराइतकाच आहे मात्र वृद्धांची संख्या वेगाने वाढली आहे. परिणामी जपानची वृद्धत्वकडे वेगाने वाटचाल सुरू झाली आहे.

सध्याच्या आकडेवारीनुसार जपानमधील दर चार माणसांमागे १ नागरिक ६५ वा त्याहून अधिक वयाचा आहे. जन्मदरात झालेली घट ०.१७ इतकी आहे. जपानच्या सध्याच्या लोकसंख्येत दीर्घकाळ तेथे राहणारे परदेशी लोकही समाविष्ट आहेत. तर गेल्या १५ वर्षात वृद्धांची संख्या १० लाखांवरून ३ कोटी ३० लाखांवर गेली आहे. जन्मदरात घट आणि आयुष्यमानात झालेली वाढ यामुळे ही परिस्थिती आली असल्याचे सांगितले जात आहे.

तज्ञाच्याअंदाजानुसार २०६० साली जपानची लोकसंख्या ८ कोटी ६० लाखांनी घटेल. मात्र त्यावेळेपर्यंत ६५ वा त्यावरील वय असलेल्यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के इतके होईल अशी शक्यता आहे.

Leave a Comment