अमेरिका, ब्रिटन देशांचे पासपोर्ट सर्वाधिक ताकदवान

passport
पासपोर्ट ही त्या त्या देशाची ताकद म्हणून ओळखली जाते. पासपोर्ट देशाचे सरकार आपल्या व दुसर्‍या देशाच्या नागरिकांना येण्या जाण्याचे किती स्वातंत्र्य देते हे सांगणारे आरसे असतात. आर्टन कॅपिटल या अर्थसल्लाकार कंपनीने त्यासाठी रॅकींग सिस्टीम तयार केली आहे. त्यानुसार यूएसए, ब्रिटीश पासपोर्ट जगात सर्वात ताकदवान असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे रॅकींग तयार करताना व्हिसाची गरज नाही अथवा व्हिसा ऑन अरायव्हल ची सुविधा किती देशांत त्या देशाच्या नागरिकांना उपलब्ध आहे त्याचा निकष लावला गेला आहे. त्यानुसार यूएसए आणि ब्रिटनच्या पासपोर्टधारकांना ही सुविधा १४७ देशात उपलब्ध आहे.

या यादीत भारत ५९ व्या स्थानावर आहे. दोन नंबरवर फ्रान्स, जर्मनी, द.कोरिया हे देश आहेत. भारतातील पासपोर्ट धारकांना ५९ देशांत व्हिसा शिवाय अथवा व्हिसा ऑन अरायव्हल घेऊन जाता येते. या यादीत सिएरा, लियोन, नामिबिया, निकाराग्वा हे देश भारताच्या पुढे आहेत तर चीन ४५ नंबरवर आहे. पाकिस्तानचा नंबर ७१ वा आहे तर बांग्लादेश ६७ व्या स्थानावर आहे. या यादीत म्यानमार, द.सुदान हे देश सर्वात खालच्या नंबरवर आहेत.