मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला घेतात सर्वात जास्त पगार

satya-nadella
नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे प्रमुख आणि भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक सत्या नडेला हे अमेरिकेतील सर्वात जास्त पगार घेणारे सीईओ आहेत. एका वर्षाला तब्बल ८४.३ मिलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सांगायचे तर ५२५ कोटी रुपये एवढा भला मोठा नडेला यांचा पगार आहे.

अमेरिकेतील सर्व कंपनींच्या सीईओंच्या पगाराबाबत ‘दि इक्वूलर १०० सीईओ पे स्टडी’च्या एका रिसर्च टीमने अभ्यास केला. गेल्या वर्षी या यादीत ओरेकसच्या सीईओ लॅरी एल्लीसन अव्वल स्थानी होत्या. मात्र यावर्षी सत्या नडेला पहिल्या क्रमांकावर आहेत, तर दुसऱ्या स्थानावर लॅरी एल्लीसन आहेत. सर्वात जास्त पगार घेणाऱ्या सीईओंच्या यादीत आणखी एक भारतीय आहेत. ते म्हणजे पेप्सिकोचे सीईओ इंद्रा नूई. इंद्रा नूई हे यादीत १९ व्या स्थानावर आहेत. नुई हे वर्षाला १९.०८ मिलियन डॉलर म्हणजे तब्बल ११८ कोटी रुपये एवढा पगार घेतात.

Leave a Comment