मनात येईल तेव्हा हिरवा करा ट्रॅफिक सिग्नल

trafic
लंडन – ब्रिटनच्या न्यूकॅसल विभागात नवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग सुरू झाला आहे. यांत वाहनचालकाला हवे असेल तेव्हा ट्रॅफिक सिग्नल हिरवा करण्याची सुविधा दिली गेली आहे. चालकाला टॅफिक लाईटबद्दल माहिती देतानाच ते कंट्रोल करता येतील अशी ही सुविधा आहे. त्यासाठी चालकाला फोनवर एक अॅप डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. या अॅपच्या मदतीने सिग्नलवर बसविलेले सेन्सर वाहन पाहिल्यानंतर त्यांची माहिती कंट्रोल रूमला जोडून देणार आहेत व तेथे तज्ञ वाहनाची सध्याची स्थिती पाहून चालकाने किती वेगाने गाडी हाकली तर त्याला हिरवा सिग्नल मिळून थांबावे लागणार नाही याची माहिती देणार आहेत.

अॅम्बुलन्स वाहनांना तर लाईट कंट्रोलची सुविधाही मिळणार आहे. म्हणजेच त्यांना थांबावे लागू नये म्हणून चालक लाल दिवा हिरवा करू शकणार आहेत. रात्री कमी गर्दीच्या वेळी ही सुविधा टॅक्सीचालकही वापरू शकणार आहेत. यामुळे सिग्नलपाशी जाणारा वेळ वाचेल, प्रदूषण कमी होईल, इंधन वाचेल आणि टॅक्सीचे भाडेही कमी येईल असा संशोधकांचा दावा आहे. विशेष म्हणजे सायकल स्वारांनाही ही सवलत मिळणार आहे. त्यामुळे पादचार्‍याना रस्ता ओलांडण्यास थोडा जादा वेळ मिळू शकेल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment