आंब्यांच्या सुरक्षेसाठी पठाण

mango
सुरत- गुजराथेतील आंब्याच्या बागांसाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या बलसाड जिल्हयात सध्या आंबा बागांच्या रक्षणासाठी पठाण लोक आले असून ते घोड्यावरून बागांचे रक्षण करत आहेत. चोरांनी अथवा व्रात्य पोरट्यांनी आंबे तोडू नयेत, बागेत घुसू नये यासाठी हे पठाण पहारा करत आहेत. अशा प्रकारे या भागात सुमारे ४५ पठाण नेमले गेले आहेत.

बलसाडचा हापूस हा विशेष प्रसिद्ध आंबा. आमरायातून झाडे सध्या आंब्याच्या भाराने लवली आहेत. यंदा अवकाळी पावसाने ७० टक्के पीक वाया गेले आहे. त्यामुळे उरलेला माल तरी वाचविणे आंबा बागायतदारांना आवश्यक ठरले आहे. यंदा आंबा महागही आहे. या भागात आमरायांच्या राखणीसाठी असे पठाण येण्याची प्रथा जुनी आहे. राजस्थानच्या बाडमेर भागातून हे लोक दरवर्षी इकडे आपल्या घोड्यांसह येतात आणि आमरायांचे रक्षण करतात.

या पठाणांनी दिलेल्या माहितीनुसार गेली २० वर्षे हे पठाण या भागात येत आहेत. अर्थात पूर्वी ते चोरांपासून संरक्षण देण्यासाठी येथे येत असत आता आंब्यांच्या रक्षणासाठी येतात. त्यांचा पहारा इतका कडक असतो की बागेत घुसताना कुणीही दोनवेळा विचार करावा अशी परिस्थिती असते.

Leave a Comment