रेनाँची नवी योजना – कारलेस शोरूम्स

renault
भारतीय कार बाजारात वेगाने प्रगती करत असलेल्या रेनाँने भविष्यात कारलेस शोरूम्सची योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर त्याचे काम सुरू करण्यात आले असून त्यासाठी कंपनीने टिव्हीएस अॅन्ड सन्स या टिव्हीएस पॅरेंट कंपनी असलेल्या कंपनीशी सहकार्य करारही केला आहे. या मागची कल्पना अशी आहे की शोरूम मध्ये प्रत्यक्षात कार असणार नाहीत मात्र कारसंदर्भातली सर्व माहिती डिजिटल स्क्रीनवरून ग्राहकाला मिळू शकणार आहे. त्यासाठी इंटरनेट इनेबल्ड टिव्ही सेट बसविले जाणार आहेत.

कंपनीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सुमित सावणे या विषयी अधिक माहिती देताना म्हणाले, डिजिटल शो रूम हा आमचा पहिला प्रयोग आहे. तो यशस्वी ठरला तर देशभर अशाच पद्धतीच्या शोरूम्स सुरू केल्या जातील. शेवटी ग्राहक रस्त्यावर कार पाहिल्यानंतरच चौकशीला येत असतो. शोरूम मध्ये त्याला कार जास्त जवळून पाहता येते. त्यासाठी शोरूम मध्ये कार हवीच अशी गरज नाही कारण ती डिजिटल स्क्रीनवर पाहता येणार आहे. यात कार प्रत्यक्षात वितरकाच्या स्टॉकयार्डमध्ये असतील. वितरकाला शोरूम पेक्षा स्टॉकयार्डचे भाडे कमी पडते परिणामी त्यांचा फायदा होईल. सध्या कंपनीचा भारतीय बाजारातील शेअर २ टक्के असून तो ५ वर नेण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.