एसएएफएलने इक्विटी आणि दीर्घकालीन कर्जाकरिता उभारले ११२ कोटी रुपये

loan
मुंबई : रिटेल शेतकी वित्तावर लक्ष केंद्रीत करणारी भारतातील पहिली नॉन बँकींग फायनान्स कंपनी (एनबीएफसी) असलेल्या सस्टेनेबल अ‍ॅग्रो-कमर्शियल फायनान्स लिमिटेड (एसएएफएल)ने आपल्या शेतकी कर्ज उपक्रमांकरिता मंडल कॅपिटल एजी लिमिटेड (मंडल)मधून 70 कोटी रुपयांच्या एनसीडींच्या रुपात लाँग टर्म नॉन-कन्व्हर्टिबल, सबॉर्डिनेट बॉण्ड्सची उभारणी केली आहे. हे एनसीडी या कंपनीच्या टिएर 2 भांडवलाच्या स्वरुपात उभारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, एसएएफएलने 24 कोटी रुपयांच्या 10/- रुपये दर्शनी मूल्याच्या 2.40 कोटी इक्विटी शेअर्सचे वाटप केले आहे आणि त्यांच्या शेअर प्रीमियमचे मूल्य 18 कोटी रुपये आहे. मंडल ही भारतातील जलद गतीने वाढणार्‍या खाद्य आणि शेती व्यवसायामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणारे निधी व्यवस्थापक कंपनी आहे.

जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड (जेआयएसएल)द्वारा पुरस्कृत असलेली एनबीएफसी- एसएएफएल महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणामधील आणि त्यानंतर मध्य प्रदेश व गुजरातमध्ये ग्रामीण आणि अर्ध शहरी भागांमधील आपली पोहोच विस्तृत करण्याकरिता भांडवल उभारणी करत आहे. एसएएफएल ही प्रत्येक शेतकी कार्यांकरिता विविध वित्त पर्याय पुरवण्याकरिता शेतकी कर्जे पुरवणारी पहिली एनबीएफसी आहे. ही कंपनी पुढील पाच वर्षांमध्ये भारतभरातील ग्रामीण आणि अर्ध शहरी भागांमधील 250 शाखा/सॅटेलाईट कार्यालयांच्या माध्यमातून आपली पोहोच विस्तृत करु इच्छिते. एसएएफएल ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेतकी प्रकल्प, लिफ्ट इरिगेशन योजना, लघु व्यवसाय, शेतावरील लहान उपकरणे, सोलार पंप्स आणि उपकरणे, शेती यांत्रिकीकरण, भूविकास, उद्यानविद्या, पॉलि हाऊसेस, शेड नेट्स, डेअरी अशा मायक्रो इरिगेशन सिस्टीम्स (एमआयएस)करिता निधी पुरवते.

याबद्दल बोलताना एसएएफएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरविंद सोनमळे म्हणाले, ‘‘एसएएफएल इतर राज्यांमध्ये सातत्याने विस्तार साधत आहे आणि या कामी आम्हाला मंडलची साथ मिळाल्याने या क्षेत्रात आमच्या कंपनीच्या नावाला वजन येईल, अशी अपेक्षा आहे.’’

श्री. सोनमळे म्हणाले, ‘‘आता आम्ही अधिकाधिक शेतकी कर्जे देण्याच्या विचारात आहोत आणि एकंदर परिस्थिती त्याला अनुकूल दिसते आहे.’’

मंडल कॅपिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उदय गर्ग म्हणाले, ‘‘भारतामध्ये उदयाला येत असलेल्या खाद्य आणि शेतीविषयक पायाभूत क्षेत्रामध्ये उद्याच्या आश्‍वासक कंपन्या बनू शकणार्‍या कंपन्यांचा शोध घेणे हे मंडलचे ध्येय आहे. आयएफसी आणि जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडसोबत एसएएफएलमध्ये भागीदार म्हणून सामील होताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.’’

70 कोटी रु. एनएसडीच्या वाटपातून टिएर 2 भांडवल उभारणी केल्याने एसएएफएल सर्वोत्तम भांडवल असलेली बँकेतर वित्त कंपनी बनणार आहे. त्यामुळे कंपनीला अधिक स्पर्धात्मक दरामध्ये कजार्र्ऊ निधी उपलब्ध होणार असून तिला अधिकाधिक दीर्घकालीन कर्जे देऊ करता येणे शक्य होणार आहे. या इक्विटी गुंतवणूकीमुळे जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे भाग 61.25 टक्क्यांवरुन 49 टक्क्यांवर येणार आहेत.