विश्वसुंदरी रोलेन स्ट्रास महाराष्ट्र दौर्‍यावर

miss-world
विश्वसुंदरी रोलेन स्ट्रास आणि मिस युके कॅरिना टायरल प्रथमच भारत भेटीवर आल्या असून त्या सर्वप्रथम महाराष्ट्रात तीन दिवसांचा दौरा करत आहेत. रोलेन आणि टायरल ने राज्यात पहिला दिवस शिरपूर येथे घालविला आणि त्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दीही झाली होती.

या दोघींनी शिरपूर येथे ग्रामीण भागात आपला पहिला दिवस घालविला. तेथे त्यांनी ग्रामस्थांची भेट घेतली, शाळेला भेटी दिल्या, शालेय विद्यार्थ्यांनी स्वागतासाठी केलेल्या नृत्यात रोलेन सहभागीही झाली. विद्यार्थ्यांशी त्यावेळी गप्पाही झाल्या. त्यानंतर त्यानी टेस्क्टाईल मिलला भेट दिली आणि आमदार अमरिश पटेल यांच्या सोबत स्थानिक पदार्थांचा मनमुराद आस्वादही घेतला.

या दोघींच्या स्वागताची ग्रामस्थांनी जंगी तयारी केली होती. सुवासिनींनी दोघींनाही कुंकुमतिलक लावून ओवाळले असे समजते.