बंगळुरू – बंगळुरूमधील फ्लिपकार्टच्या कार्यालयात लिनोव्होच्या ए६००० प्लस या स्मार्टफोनचे लाँचिंग करण्यात आले. या फोनची किंमत अद्याप गुलदस्त्यात नाही परंतु ६,९९९ रुपयांपेक्षा ती जास्त नसेल असा अंदाज बांधण्यात येत आहे.
फ्लिपकार्टच्या कार्यालयात लिनोव्हो ए६००० प्लसचे लाँचिंग
या फोनमध्ये ४ जी एलटीइला सपोर्ट करणारे तंत्रज्ञान उपलब्ध असल्यामुळे इंटरनेट अॅक्सेस करणे सोपे आणि जलद होईल. या फोनचे रॅम जास्त आहे. ए६००० पेक्षा या फोनमध्ये अधिक सुविधा उपलब्ध आहेत. २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनेल स्टोरेज कॅपेसिटी, ८ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि २ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा, ५ इंची एचडी स्क्रीन ४.४ अॅंड्रॉइड किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम, २३०० एमएएच बॅटरी ही या फोनची वैशिष्ट्ये आहे.