पुढील महिन्यात येणार रेनॉल्टची हॅचबॅक कार

hachback
नवी दिल्ली – रेनॉल्ट भारतामध्ये मारुति अल्टो ८०० आणि हुंडाई इऑनला टक्कर देण्यासाठी छोट्या कारच्या वर्गवारीमध्ये कार लाँच करणार असून ८०० सीसीची ही कार पुढील महिन्यात लाँच केली जाणार आहे, अशी घोषणा निसान आणि रेनॉल्टचे मुख्याधिकारी कार्लोन घोस्न यांनी केली आहे. रेनॉल्ट आणि निसानने विकसित केलेले तंत्रज्ञान सीएमएफ-ए या तंत्रज्ञानावर ही कार आधारित आहे. या कारला ३ सिलेंडर आहेत. हे एक ग्लोबल प्रोडक्ट असून भारतासह दक्षिण अफ्रिका आणि ब्राझिलमध्ये देखील या कारचे लाँचिंग २० मे रोजी होणार आहे.

Leave a Comment