एअरटेलने केले नेट न्युट्रालिटीचे समर्थन

airtel
नवी दिल्ली – एअरटेलने नेट न्युट्रालिटी व्हायोलेशन विरोधातील लढा तीव्र झाल्यानंतर नेट न्युट्रालिटीचे आपण देखील समर्थन करीत असल्याचे जाहीर केले आहे.

एअरटेल झिरो ही योजना सर्वांसाठी खुली असून ती कोणाबाबतही भेदभाव करित नाही असे स्पष्टीकरण एअरटेलने दिले आहे. तर कालचे एअरटेल झिरो या योजनेतून फ्लिपकार्टने काढता पाय घेतला. त्यामुळे या स्किमच्या भवितव्याबाबत ग्राहकांच्या मनात शंका निर्माण झाल्यामुळेच एअरटेलने आज स्पष्टीकरण दिले आहे. एअरटेल झिरोबाबत अनेक गैरसमज निर्माण झाले होते. एअरटेल झिरो हा ओपन मार्केटिंग प्लॅटफॉर्म आहे असे एअरटेलने म्हटले आहे.

Leave a Comment