आता भूकंपाची मिळणार पूर्वसूचना

earthquake
वॉशिंग्टन : एका संशोधनात स्मार्टफोन व इतर उपकरणांमधील संवेदकांच्या मदतीने भूकंपाची पूर्वसूचना काही काळ आधी मिळू शकते, असा दावा करण्यात आला आहे. भूगर्भातील हालचाली या उपकरणांच्या संवेदकांनी टिपता येऊ शकतात. संशोधकांच्या मते जगाच्या अनेक भागात महागडी उपकरणे परवडत नसल्यामुळे स्मार्टफोनवर भूकंपाची पूर्वसूचना काही काळ आधी मिळाली तरी ती फायद्याची ठरणार आहे.

स्मार्टफोन व इतर यंत्रातील संवेदक हे भूकंपाची पूर्वसूचना देण्यासाठी वापरता येतात. ही प्रणाली फार अचूक नसली तरी त्याला ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमचा आधार असल्याचे यूएस जिऑलॉजिकल सर्व्हे या संस्थेच्या वैज्ञानिकांनी सांगितले आहे. जीपीएस रिसिव्हरच्या मदतीने जमिनीतील भेदक हालचाली टिपता येतात. क्राऊड सोर्सिग निरीक्षणात असे दिसून आले की, स्मार्टफोनच्या मदतीने भूकंपाची पूर्वसूचना कळू शकते व त्यामुळे आपण सावध होऊ शकतो. या संस्थेतील भूभौतिक शास्त्रज्ञ सारा मिन्सन यांनी याबाबत शोधनिबंध लिहिला असून त्यांच्या मते भूकंपाची पूर्वसूचना देणारी यंत्रणा संवेदकांनी लहरी पकडूनच आपल्याला सावध करीत असते त्यामुळे अर्थक्वेक अर्ली वॉर्निग सिस्टीम या जपान, मेक्सिको यासारख्या देशात वापरल्या जातात. त्यांची चाचणी ७ रिश्टरच्या भूकंपात व जपानमधील टोहोको ओकी येथे २०११ मध्ये झालेल्या ९ रिश्टरच्या भूकंपात झालेली आहे. या प्रणालीच्या मदतीने पाच हजार लोकांना जरी मोबाईलवर माहिती मिळाली किंवा भूकंपाची सूचना संवेदकाने मिळाली तरी ती इतरांना देता येते.

Leave a Comment