दररोज दहा तास लँडलाईनवरुन फुकटात बोला

bsnl
मुंबई : लँडलाईन फोन कंपन्या मोबाईल फोन आल्यामुळे पिछाडीवर पडल्या होत्या पण आता लँडलाईनला पुनर्जीवन देण्यासाठी कंबर कसली असून कुठल्याही राज्यातील बीएसएनलधारक १ मेपासून रात्री ९ ते सकाळी ७ यावेळेत कोणालाही मोफत फोन करु शकतील.

सध्या फक्त ब्रॉडबँड कनेक्शनसाठी बीएसएनएलचे धारक सेवेचा उपयोग करतात. इंटरनेट न वापरणाऱ्या ग्राहकांनी लँडलाईन फोनचे कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली असून अशा ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे रात्री ९ ते सकाळी ७ या वेळेत मोफत फोन करु देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बीएसएनएलतर्फे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment