घनदाट केसांसाठी आपलेच केस उपटा

hair
दाट लांबसडक केस हे महिलांसाठी सौदर्याचे लक्षण असतेच पण टक्कल पडणे हे पुरूषांसाठीही कांहीसे मानहानीकारक असते. दाट केस हवेत यासाठी अनेक उपाय केले जातात. मात्र केस गळण्याच्या समस्येवर एक नवीनच उपाय संशोधकांना सापडला आहे. यामुळे टक्कलवाल्यांना ही खूषखबर नक्कीच वाटेल.

युनिव्हर्सिटी ऑफ सर्दन कॅलिर्फार्नियातील संशोधकांनी केलेल्या संशोधनात असे आढळले आहे की आपण आपले २०० केस उपटले तर त्याजागी किमान १२०० नवीन केस येतात. संशोधकांचे प्रमुख चेंग मिग चाँग या संदर्भात म्हणाले, त्यांनी उंदरांवर केलेल्या या प्रयोगातून असे सिद्ध झाले की डोक्यावरचे खास केस उपटले तर त्या जागी मोठ्या संख्येने नवीन केस उगवतात. कपाळावरचा एक केस उपटला तेव्हा आसपासच्या भागात त्याचा प्रभाव त्वरीत पडतो आणि त्या जागी नवे केस येऊ लागतात असे दिसून आले. उंदरांवर प्रयोग करताना विविध ठिकाणचे २०० केस उपटले तेव्हा त्याजागी ४५० ते १३०० नवीन केस उगवल्याचे त्यांना दिसून आले. क्वॉरम सेंन्सिंगच्या सिद्धांतानुसार हे घडते असा त्यांचा दावा आहे. हे संशोधन जर्नल सेल मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
———-

Leave a Comment