शिओमीने गिनिज बुकमध्ये नोंदविला विक्रम

xiomi
चीनी स्मार्टफोन कंपनी शिओमीने २४ तासात २१ लाख १० हजार स्मार्टफोन विकून गिनिज बुकमध्ये विक्रीचा विक्रम नोंदविला आहे. टेक क्रंच वेबसाईटवर दिल्या गेलेल्या माहितीनुसार शिओमीने फेस्टीव्हल मी फॅन २०१५ आयोजित केला आणि आशिया खंडातील ७ देशांत एकाचवेळी आपल्या स्मार्टफोनची विक्री सुरू केली. तेव्हा १२ तासातच कंपनीने २१ लाख१० हजार स्मार्टफोनची विक्री केली. त्यातून कंपनीला ३३५ दशलक्ष डॉलर्स महसूल मिळाला.

या फेस्टीव्हलच्या माध्यमातून कंपनीने ३८ हजार एमआय टिव्ही, ७,७०,००० स्मार्ट अप्लायन्सेसचीही विक्री केली आहे. या बरोबरच कंपनीने त्यांचेच फ्लॅश सेलचे रेकॉर्डही तोडले आहे. भारत, इंडोनेशिया, मलोशियातही हा सेल झाला. शिओमीने गतवर्षी फॅनडे च्या माध्यमातून ६ कोटी स्मार्ट अप्लायन्सेस विकली होती ती संख्या आता १० कोटींवर जाईल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment