स्वदेशी कागदावर छापली गेली होती १० हजाराची नोट

10000
भारतीय चलनातील कागदी नोटा छापण्यासाठी कागद व शाई परदेशातून आयात केली जाते याची माहिती आपल्याला आहे.रिझर्व्ह बँकेने त्यांचा ८० वा वर्धापनदिन नुकताच साजरा केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलन छपाईचा खर्च कमी करता यावा यासाठी भारतात बनलेल्या कागदावर आणि स्वदेशी शाईचा वापर करून चलनी नोटा छापल्या जाव्यात अशी इच्छाही व्यक्त केली व त्यानुसार आता लवकरच स्वदेशी कागदावरच नोटा छपाई सुरू करण्यात येणार आहे..

विशेष म्हणजे पूर्वी ज्या नोटा छापल्या जात होत्या त्या भारतात बनलेल्या कागदावरच छापल्या जात होत्या हे अनेकांना माहिती नाही. भारतीय कागदावरच पहिली १० हजारांची नोट छापली गेली आहे. आणि त्यामुळे आजही भारतीय कागदावर पुन्हा नोटांची छपाई सहज शक्य आहे असे सांगितले जात आहे. १९३८ साली प्रथम आरबीआयने १० हजाराची नोट छापली असली तरी पहिले कागदी चलन आले ते ५ रूपयाच्या नोटेचे जानेवारी १९३८ मध्ये. त्याचवर्षी १०, १००, १००० व दहा हजार रूपयांच्या नोटाही छापल्या गेल्या. इतकेच नव्हे तर ५ हजार रूपयांची नोटही छापली गेली.

१९४६ पासून मात्र १ व दहा हजारांच्या नोटांची छपाई बंद केली गेली. त्यानंतर १९५४ मध्ये पुन्हा १० हजारांच्या नोटा छापल्या गेल्या. १९७८ पासून मात्र या नोटांची छपाई पूर्णपणे बंद केली गेली. १८ व्या शतकात बँक ऑफ बंगाल, बॉम्बे व मद्रास या बँकांनी कागदी नोटा छापल्या होत्या. नंतर चलन कायद्यानुसार १८६१ मध्ये चलनी नोटा छपाईचे अधिकार भारत सरकारला दिले गेले. त्यानंतर १९३५ साली रिझर्व्हबँकेची स्थापना होईपर्यंत हे अधिकार सरकारकडे होते. व आता हे अधिकार रिझव्हॅ बँकेकडेच आहेत.

Leave a Comment