सामन माशाचे अद्भूत शिल्प असलेली इमारत

saman
जगात अनेक ठिकाणी वास्तूशिल्पे अशा पद्धतीने बांधली जातात की पाहणार्‍यांना ते चुकीने झाले असावे असे तरी वाटते किवा कांही अपघाताने या वास्तूशिल्पाला असे स्वरूप आले असावे असे तरी वाटते. मात्र जगभरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अशी अद्भूत वास्तूशिल्पे मुद्दाम तयार केली जातात आणि त्यात अभियंते आणि कला यांचा मनोहर संगमही असतो.

अमेरिकेच्या पोर्टलंडमध्येही असेच एक वास्तूशिल्प असून ते सामन बिल्डींग म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे पोर्टर्लंडच्या टॉप आकर्षणातील ते एक महत्त्वाचे आकर्षण असून येथे येणारे पर्यटक हे शिल्प पाहिल्याशिवाय परतत नाहीत. पर्यटन तज्ञांच्या मते चांगल्या स्कल्पचरची आठवण पर्यटकांच्या मनात दीर्घकाळ राहते व त्यामुळेच जगभरात अशी शिल्पे आवर्जून बनविली जातात.

Leave a Comment