एलियो – तीन चाकी कार

elio
एलिओ मोटर्स कंपनीने भविष्यातील ड्रीम कार तयार केली असून ही कार तीन चाकांवरच धावणार आहे. फिनिक्समधील या कंपनीने ही कार बनविताना ती इंधन बचत करू शकेल अशा प्रकारेच ती डिझाईन केली आहे. या कारची किंमत ६८०० डॉलर्स म्हणजे साडेचार लाख रूपयांच्या घरात असून तिचे इंजिन गॅसवर चालणार आहे.

कंपनीच्या दाव्यानुसार ती साडेतीन लिटर मध्ये हायवेवर ८४ किमी धावेल. ही दोन सीटर कार २०१६ मध्ये बाजारात येईल असेही समजते. या कारसाठी अॅडव्हान्स बुकींग सुरू झाले असून त्याला फारच चांगला प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत १ लाख ४० हजार जणांनी या कारसाठी नोंदणी केली आहे. कंपनीने कार नोंदणीसाठी रिफंडेबल आणि नॉन रिफंडेबल असे दोन पर्याय दिले होते व विशेष म्हणजे बहुतेक ग्राहकांनी नॉन रिफंडेबल पर्याय निवडला असल्याचेही सांगितले जात आहे.

या कारचे व्यावसायिक पातळीवर उत्पादन करण्यासाठी कंपनीला २३ कोटी डॉलर्सचा निधी आवश्यक असून नोंदणीतून आत्तापर्यंत साडेसहा कोटी डॉलर्स जमा झाले आहेत. ही कार २०१४ मध्येच बाजारात येणार होती मात्र आर्थिक अडचणींमुळे ती त्यावेळी येऊ शकली नाही असेही समजते.

Leave a Comment