आसूसचा वेगवान झेनफोन टू २३ एप्रिलला भारतात

asus
आसूसने त्यांचा वेगवान झेनफोन टू हा स्मार्टफोन दिल्लीत २३ एप्रिलला होत असलेल्या कार्यक्रमात लाँच करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. कंपनीचा हा नवा फ्लॅगशीप फोन लास वेगास येथील सीईएस २०१५ मध्ये प्रथम सादर करण्यात आला होता. तीन व्हेरिएंटमध्ये हा फोन लाँच केला जात आहे. त्यातील एक अर्गनॉमिक डिझाईन आहे.

या फोनसाठी ५.५ इंची फुल एचडी आयपीएल डिस्प्ले, १७८ डिग्रीच्या व्हू अँगलसह देण्यात आला आहे. टॉप व्हेरिएंटमध्ये ४ जीबीची रॅम आहे.परिणामी गेमिंग परफॉमर्सन्सचा वेग पूर्वीच्या फोनच्या तुलनेत किमान ५ ते सात पट वाढणार आहे. या फोनसाठी बिल्टइन फोर जी सुविधा दिली गेली आहे परिणामी डेटा स्पीड १५० पर्यंत वाढतो. वायफायही फास्ट असून डयुअल अॅक्टीव्ह मोड सह ड्युअल सिमही दिले गेले आहे. या मुळे एकाचवेळी युजर दोन अॅक्टीव्ह फोन लाईन्स वापरू शकतो. १६, ३२, ६४ जीबी मेमरी आहे.

फोनला १३ एमपीचा रियल टोन फ्लॅश असलेल्या कॅमेरा दिला गेला आहे. यामुळे स्कीन टोन गरम राहतो आणि अचूक रंग दिसू शकतात. ५एमपीचा फ्रंट कॅमेरा, अँड्राईड लॉलीपॉप ५.०, trट्रेंड मायक्रो सिक्युरिटीसह व कस्टमाईयझेबल सुविधेसह दिले गेले आहे. पाच रंगात हा फोन उपलब्ध आहे. भारतात त्याची किंमत किती असेल हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

Leave a Comment