फेसबुकवरच्या मोदींच्या पोस्टला झुकेरबर्गचे लाईक

likes
ट्विटरप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी फेसबुकवरही सक्रीय झाले असून त्यांनी टाकलेल्या पोस्टला कांही तासांच्या आत प्रचंड प्रतिसादही मिळाला आहे. विशेष म्हणजे फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यानेही मोदींच्या या पोस्टला लाईक केले आहे.

मोदींनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी बद्दल विशेष मायक्रो साईट बनविली आहे. नरेंद्र मोदी डॉट इन स्लॅश वाराणसी या नावाच्या या साईटची माहिती व लिंक त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. ती मार्क झुकेरबर्गला आवडल्याने त्याने लाईक केले आहे. मोदी या पोस्टमध्ये म्हणतात, माझ्या साईटवर बनविलेले वाराणसीला समर्पित खास पेज आपल्याला आवडेल अशी आशा आहे. या साईटची माहिती मोदींनी फेसबुकवर दिल्यावर त्यांना कांही तासात हजारो लाईक मिळाल्याचेही समजते.

गतवर्षी मार्क झुकेरबर्गने भारत दौरा केला होता त्यावेळी त्याने पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली होती.