
भारतात विक्रीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त असा लिनोव्होचा ए ७००० उपलब्ध झाला असून इ-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या फोनची किंमत ८,९९९ रुपये आहे.
भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला लिनोव्होचा ए ७०००
या फोनमध्ये एचडी रिसोल्युशन असलेली ५.५ इंची स्क्रीन व्हिडिओज, गेमिंग आणि वेब ब्राउसिंगचा आनंद द्विगुणित करते. २ जीबी रॅम आणि द ८ कोर प्रोसेसरमुळे मोबाईलचे सर्व काम सुरळीत चालेल. ८ कोर प्रोसेसर मुळे बॅटरीही लवकर खर्च होणार नाही. जर ऑनलाईन गेम खेळताना किंवा व्हिडिओ कॉल करताना आपल्याला नेहमी नेहमी व्यत्यय येत असेल तर ४जी एलटीइ यावर उपाय आहे. अॅंड्रॉइड लॉलीपॉप ५.० ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा हा फोन नवीन फीचर्सनी सज्ज आहे. ८ मेगा पिक्सल बॅक कॅमेरा आणि ५ मेगा पिक्सल फ्रंट कॅमेरा या फोनला देण्यात आला आहे. सेल्फी लवर्सचा विचार करुन हे फीचर देण्यात आले आहे.
