इनफोकसचा एम ३३० भारतात उपलब्ध

m330
अमेरिकन कंपनी इनफोकस ने त्यांचा एम ३३० हा स्मार्टफोन भारतात लाँच केला असून स्नॅपडीलवर त्याची विक्री सुरू केली आहे. प्रत्यक्षात १२९९९ रू. किंमत असलेला हा स्मार्टफोन स्नॅपडीलवर ९९९९ रूपयांत उपलब्ध करू न दिला गेला आहे. इनफोकसचा भारतात लाँच झालेला हा दुसरा स्मार्टफोन आहे. यापूर्वी कंपनीने एम टू हा स्मार्टफोन ४९९९ रूपयांत उपलब्ध करून दिला आहे.

एम ३३० हा ड्युअल सिम व अँड्राईड किटकॅट ४.४ ओएसवर चालणारा फोन आहे. त्याच्यासाठी ५.५ इंचाचा एचडी डिस्प्ले, २ जीबी रॅम, गेम्स खेळण्यासाठी माली ४५० जीपीयू, १३ एमपीचा रियर एलईडी फ्लॅशसह कॅमेरा, ८ एमपीचा फ्रट कॅमेरा, १६ जीबी मेमरी आणि मायक्रो कार्डने ती ६४ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा अशी फिचर्स दिली गेली आहेत. फोनसाठी थ्रीजी, ब्ल्यू टूथ, वायफाय, यूएसबी कनेक्टीव्हीटी असून १८ तासाचा टॉकटाईम व ५५० तासांच्या स्टँडबाय बॅकअप देणारी बॅटरी दिली गेली आहे. फोनचे वजन आहे १६७ ग्रॅम

Leave a Comment