‘व्हॉटसअप’चाही ‘फेसबुक’च्या अॅपमध्ये समावेश

facebook
मुंबई : आता फेसबुक आणि व्हॉटसअप वापरण्यासाठी तुम्हाला एकच ‘अॅप’ तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करावे लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉटसअपचाही फेसबुक आपल्या मोबाईल अॅपमध्ये समावेश करणार आहे. ही योजना प्रत्यक्षात आली तर फेसबुकच्या माध्यमातून व्हॉटसअपवर मॅसेज पाठवता येऊ शकेल. फेसबुक अॅपच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये काही युझर्सनं स्टेटस अपडेटसच्या अॅक्शन बटन्समध्ये व्हॉटसअपसारख्या आयकॉनवाला ‘सेन्ड’ बटन नोटीस केले आहे. यासाठी तुम्हाला वेगळे व्हॉटसअप ओपन करण्याची गरज भासणार नाही. यामध्ये, फेसबुकचे स्टेटस अपडेट केल्यानंतर खाली लाईक, कमेंट, शेअर या ऑप्शन्ससोबतच ‘सेन्ट’चेही बटन असेल. यामध्ये, व्हॉटसअपचा आयकॉन दिला गेला आहे.

म्हणजेच, तुम्ही तुमची कोणतीही फेसबुक पोस्ट आपल्या व्हॉटसअप कॉन्टॅक्टला पाठवू शकता. हे बटन खाली शेअरच्या बाजुला उपलब्ध असेल. फेसबुकचे हे फिचर अजूनही ‘टेस्टिंग’ अवस्थेतच असल्यामुळे, हे अजूनपर्यंत काही ठराविक यूझर्सलाच उपलब्ध करून देण्यात आले असून या फिचरची अद्याप कोणतीही अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही.

Leave a Comment