मॅक्लारेनची नवीन ५७० एस सुपरकार सादर

mclaren
ब्रिटीश कार कंपनी मॅक्लारेन पुन्हा एकदा सुपरकार मार्केटमध्ये हलचल निर्माण करण्यासाठी सिद्ध झाली असून कंपनीने त्यांची नवी कोरी मॅक्लारेन ५७० एस ही सुपरकार सादर केली आहे. नावावरूनच ती ५७० पीएस पॉवर जनरेट करते हे सूचित करण्यात आले आहे.

ही कार ० ते १०० किमी प्रति तासाचा वेग केवळ ३.२ सेकंदात गाठते तर हाच वेग २०० किमीवर नेण्यास तिला ९.५ सेकंद पुरतात. कंपनीच्या पूर्वीच्या कारप्रमाणेच ती दिसत असली तरी त्यातील ३० टक्के सुटे भाग नव्याने डिझाईन केले गेले आहेत. वजनाला तुलनेते खूप हलकी असलेली ही कार कार्बन सिरॅमिक ब्रेकसह आहे. कारची सीट लेदरपासून बनविली गेली आहेत. शिवाय कारमध्ये ७ इंची टचस्क्रीन आहे. त्याच्या मदतीने क्लायमेट कंट्रोल, ब्ल्यू टूथसारख्या इंफोटनमेंट सिस्टीम ऑपरेट करता येतात.

कारचे एकूण वजन १३१३ किलो आहे. ही कार ३२८ किमी प्रति तासाच्या वेगाने धावू शकते. तिची किंमत १ कोटी १५ लाख रूपये आहे. मात्र भारतात ही किमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Comment